साहित्यिक क्षेत्रातली अद्भुतता जोखतांना आपण कुठे आहोत हे क्षणोक्षणी जाणवत रहातं..महासागर हा ज्ञानाचा..काळबुडी मारुनही अमुल्य मोती वेचतांना शत जन्मच घ्यावेत…असा अथांग आणि गहीरा ..

कविता आणि स्फुट लेखांपासून सुरु झालेला माझा प्रवास.. महाराष्ट्र टाइम्स पासून सुरु झालेला.. अगदी इयत्ता ६वीत असतांना प्रसिद्ध झालेली पहीली कविता .. म.टा. चं आलेलं पहीलं मानधन अमुल्यच …

मेनका,माहेर,ललीत,वसुधा,गहशोभिका,विशाखा आणि जत्रा या नावलौकीक मिळवलेल्या दिवाळी अंकांतून कविता,लेख,कथा प्रसिद्ध होणं स्वप्नवतच.. तरीही लेखन चालूच राहील माझंं हे कधीच ठरवलेल नव्हत ..ध्यानी मनी नव्हतं.. एक छंद ,आवड या पलीकडे विचारच केला नव्हता कधीही .. नंतर सांसारीक जबाबदाऱ्या ,कर्तव्य यात वाहून घेतलं निवांत वेळ काढणं लेखना साठी जमलच नाही.. खर तर अभिनय क्षेत्रात काहीतरी करावं ही ओढ मनांतच राहीली….

खरी ओळख मात्र एक लेखिका,कवयित्री म्हणून आम्ही साहित्यिक या समुहाने जगाशी करुन दिली.. व्यासपीठ एवढं मोठं मिळेल कल्पनातीतच.. आजन्म ऋणांत रहाणं पसंत करेन आम्ही साहित्यिक समुहाची आणि वाचकांची..

सध्या वैचारीक लेख,ऐतिहासिक ,पौराणिक व्यक्तीरेखां विषयी,चारोळ्या,कविता ,कथा मराठी भाषेतून ,हिंदी भाषेतही शेरो-शायरी ,कविता लीहीतीय…